अखिल महाराष्ट्र कामगार संघाच्या मागणीस यश
कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – डाँ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनावरील फलक तात्काळ नविन बसवण्यात यावा.या अखिल महाराष्ट्र कामगार- कर्मचारी संघ सांगली जिल्हा यांच्या मागणीला यश आले असुन फलक तात्काळ बसवण्यात आला आहे.
अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाने सामाजिक न्याय भवन मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांना दि 10 आँगष्ट रोजी मास्क वाटप केले यावेळी, सामाजिक न्याय भवनावर डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव गायप असलेचे अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्ह्याच्या पदाधिकारी यांच्या निदर्शनास आले.त्यावेळी त्यानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.अर्जुन बन्ने यांची भेट घेऊन फलक नव्याने बसविण्या बाबत निवेदन दिले.व दोन दिवसात फलक न बसविल्यास आंदोलनाचा ईशारा दिला.या दखल जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रानी घेतली व या घटनेच्या बातम्या जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रात झाळकल्या यामुळे या घटनेची दखल घेऊन डाँ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा फलक तात्काळ बसविण्यात आला.ही बाब निदर्शनास आणुन दिल्या बद्दल जिल्हा समाज कल्याण कार्यालय तसेच जिल्ह्यातील नागरीकांकडून अखिल महाराष्ट्र कामगा कर्मचारी संघ सांगली जिल्हा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







