स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ४०३ रुग्णांनी केली कोरोनावर मात

जिल्ह्यात आज आढळले ५९५ कोरोनाबाधित;
सर्वाधिक १४४ कोरोनाबाधित जळगाव शहरात

जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.१४) कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत ५९५ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ हजार १३१ झाली आहे. सर्वाधिक १४४ रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ४०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर १४४, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ७, अमळनेर ७७, चोपडा २५, पाचोरा २७, भडगाव ६, धरणगाव ४०, यावल ६, एरंडोल ६५, जामनेर ३५, रावेर ७, पारोळा ५३, चाळीसगाव ३०, मुक्ताईनगर ४१, बोदवड २ व इतर जिल्ह्यातील ९ असा समावेश आहे. दिवसभरात 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर आणि भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी २, जळगाव तालुका, पाचोरा, चोपडा, रावेर, चाळीसगाव या तालुक्यात प्रत्येकी १ याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here