गरजू विद्यार्थ्यांनीस मोफत श्रवण यंत्र वाटप

only-samajseva-barshi

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) । ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बाशी॔ यांच्या कडून काॅलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीस अचानक ऐकणं बंद व डोळ्यास अंधुक पणा आल्याने संस्थेचे सचिव/अध्यक्ष यांना काही सामाजिक कार्यकर्ते ने संस्थे मार्फत श्रावण यंत्र देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली त्या नुसार आज ३०/६/२०२३ रोजी ध्यास कोंचिग क्लास मध्ये सकाळी ११वाजता बाशी॔ नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण साहेब व माऊली लाॅन्स चे मा.अमृत नाना राऊत यांच्या हस्ते श्रवण यंत्र देण्यात आले

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व संस्थेचा उद्देश या कृतज्ञता सोहळया बाबत संस्थेचे सचिव विजय कुमार दिवाणजी यांनी केले मा.राऊत साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांची टेटस बघून व संस्थेचे कार्य चांगले आहे म्हणून मी मदत केली आपल्या अध्यक्ष भाषण सी.ओ.बाळासाहेब चव्हाण साहेब यांनी ओन्ली समाज सेवेचे कार्य चांगले आहे संस्थेच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

ध्यास कोंचिग क्लास संस्थापक प्रा.सचिन मस्के सर यांचा ही सत्कार करण्यात आला त्या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष संतोष शेळगावकर,अजय तिवारी, सुनिल फल्ले, माणकोजी ताकभाते,सुमित खुरंगुळे,सायरा मुल्ला मॅडम,रेखा विधाते, सुजाता अंधारे,व त्या मुलीच्या आई उपस्थित होत्या कार्यक्रम पाहुणे यांचें आभार संस्थेचे सहसचिव नागनाथ सोनवणे यांनी मानले असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here