लातूर (जिल्हा प्रतिनिधी अजय कल्याने) । लातूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूरहून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी अन्नछत्र सेवा आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या वारकऱ्यांसाठी पंढरपूरहुन लातूरमध्ये उतरताच नाश्त्याची आणि मेडिकल चेकअपची सोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लातूर च्या एस. टी बस स्टॅन्ड मध्ये करण्यात आले.
आषाढी एकादशी च्या निमित्ताने लातूरचे वारकरी महिना ते दीड महिना भर उन्हात आणि पावसात भिजत पायी चालत पंढरपूरला जातात त्यावेळेस त्यांना काही आजारही उदभवतात त्यासाठी मनसे च्या वतीने पंढरपूरवरून लातूर मध्ये परतलेल्या वारकऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घेत त्यांची आरोग्य तपासणी करून गोळ्या औषध देऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस यांनी पुढाकार घेत या कार्यक्रमाला सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे उपचार करण्यात आले.







