केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांची कार्यपुस्तिका प्रकाशित

only-samajseva

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) । जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या उपस्थितीत आज (दि.५ जुलै) रोजी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती पुस्तिक स्मरणिका प्रकाशित सोहळा नागपूर येथे मा.केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाला होता.

या कार्यपुस्तिकेत ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थांच्या कार्याची माहिती पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे साहेब यांना संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी दिली पोलिस मित्र म्हणून संस्थेच्या माध्यमातून पोलिस यांचा सन्मान व पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे त्यां बद्दल ही माहिती दिली. तसेच ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थाचे पुस्तक त्याना देण्यात आले तसेच पुढील होणाऱ्या कार्यास मी स्वतः भेटतील असे आश्वासन दिले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, विजय कुमार दिवाणजी, नागनाथ सोनवणे, अजय तिवारी, माणकोजी ताकभाते, गणेश सातारकर,सागर घंटे, रेखा विधाते, सुजाता अंधारे, कोमल वाणी,रेखा सरवदे, सुनिता गायकवाड, रागिणी झेंडे, माधुरी वाणी ,पुजा नवले हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी संस्थांच्या कार्यास पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here