पारोळा (जिल्हा प्रतिनिधी डॉ.दिपक पाटील) । पोलिसांनी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली अचानक पारोळा शहरात कोमिंग ऑपरेशन राबविले असता संशयास्पद स्थितीत फिरणारे एकूण २० लोकांना ताब्यात घेतले आहे.
या संशयास्पद लोकांना पोलीस स्टेशनला आणले असता त्यांना नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे तीलीचंद कपूर येदानी (वय 25 वर्ष), कपूर हरी येदानी (वय 52वर्ष), अतिश कपूर येदानी (वय 23वर्ष), मधू गोविंद भूरानी (वय 44 वर्ष), विकास दादू भुरानी वय (23वर्ष), नितेश कपूर येदानी (वय 19वर्ष), मिलिंद लटार पवार (वय 48 वर्ष), आकाश दादू भूरानि (वय 32वर्ष), सागर मिलिंद पवार (वय 19वर्ष), अमर मिलिंद पवार (वय 22 वर्ष), बादल दादू भुरानि (वय 20 वर्ष), देवलाल गणलाल चव्हाण, गेंदलाल उदल चव्हाण (वय 46वर्ष), चेनगिर दौलतगिर चव्हाण (वय 52 वर्ष), सागर चेनगिर चव्हाण (वय 22वर्ष), शेखर चेनगिर चव्हाण (वय 21 वर्ष), नरेश कचरू पवार (वय. 29वर्ष), मिलिंद कचरू पवार (वय 30वर्ष), कचरू भैयाजी पवार, हरपोष देवरा सोळंकी (वय 42 वर्ष) सर्व राहणार जामगढ ता. काटोल जिल्हा नागपूर असे सांगितले.
शहरात का व कशासाठी आलेत त्याबाबत उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली असलेने नमूद संशयास्पद भटकणारे इसमांचा कोणतेतरी दखलपात्र गुन्ह्याशी सबंध असावा अशी दाट शक्यता वाटल्याने सर्व इसमांची काटोल पोलीस स्टेशनकडून मागणे करीता सर्वांचे* ब* रोल पाठविले आहेत. तसेच संशयास्पद मिळून आल्याने कलम १०९, crpc प्रमाणे सर्व २० इसमांवर चॅप्टर केस करून उल्हास देवरे तहसीलदार पारोळा यांचे समक्ष हजर केले.
नमुदची कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय राजू जाधव, पीएसआय शिंदे, हे कॉ मराठे, पो कॉ किशोर भोई, पो कॉ आशिष गायकवाड, पो को अभिजित पाटील, पो कॉ राहुल पाटील, पो को हेमचंद्र साबे यांनी केली असून यापुढेही संशयास्पद स्थितीत भटकणाऱ्या इसमावर कायदेशीर सक्त कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.







