जळगाव (जिल्हा प्रतिनिधी डॉ.दिपक पाटील) । पारोळा ते विचखेडा दरम्यान छोटा हत्ती (क्र MH 19 S 4438) मधून एक म्हैस, गाय, वासरु असे कत्तलीकरिता धुळेकडे घेऊन जात असल्याची बातमी मिळाल्याने पारोळा पोलिसांनी या गाडीवर कारवाई केली.
नमूद टाटा कंपनीचे छोटा हत्तीमध्ये म्हैस, गाय, वासरु मिळून आले. चालक संजय जगन भराडी (वय ३२ वर्ष रमहींदले), गोकुळ नारायण भिल (वय ३५ वर्ष, महिंडले) या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. गाडीतील प्राणी ताब्यात घेऊन आर सी बाफना कुसुंबा गोशाळा येथे सुरक्षिततेचेदृष्टीने जमा केले आहेत. वाहतूक करणारे वाहनदेखील जप्त केले आहे.
गाडीतून प्राणी कत्तली करीता क्रूरतेने डांबून, पाणी चारा याची सुविधा न देता किंवा नियमांचे पालन न करता, आढळून आल्याने ही कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना संदीप सातपुते,पो को आशिष गायकवाड,पो को किशोर भोई,पो कॉ राहुल पाटील,पो कॉ भूषण पाटील,पो कॉ नरेंद्र पाटील,होमगार्ड चेतन पाटील यांनी केलेली आहे.







