जळगाव (संपादक सुनिल पाटील) । लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांना वाय प्लस दर्जाची पोलीस सुरक्षा देण्याची मागणी वेब मीडिया असोसिएशनतर्फे राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली, असल्याची माहिती वेब मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
विधिमंडळ अधिवेशनात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात डिजिटल मीडिया वेब मीडिया असोसिएशनच्यावतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वरिष्ठ पत्रकारांच्या शिष्टमंडळाने व वेब मीडिया असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी कमलेश सुतार वरिष्ठ पत्रकार, मुख्य संपादक लोकशाही न्यूज चॅनेल यांना वाय प्लस दर्जाची पोलीस सुरक्षा प्रधान करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
लोकशाही वृत्तवाहिनीवर भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे राजकीय पक्षातील काही समाजविघातक यांच्याकडून कमलेश सुतार यांना धोका निर्माण झालेला आहे. पत्रकारांच्या वतीने गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांना ई-मेलद्वारेही निवेदन पाठविण्यात आलेले आहे.







