पुण्यात ४० हजार रुपयांसाठी मित्राच्या पत्नीवर बलात्कार

rape
file photo

पुणे (प्रतिनिधी सुहास गायकवाड) | मित्राने उसने घेतलेले चाळीस हजार रुपये परत न केल्याने मित्राने त्याच्या पत्नीवरच मित्राला समोर बसवत बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार हडपसर येथे घडला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पिडीत ३४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादीचा पती दोघे मित्र होते. येरवडा परिसरात व्यवसाय करताना त्यांची ओळख झाली होती. याच ओळखीतून आरोपीने फिर्यादीच्या पतीला चाळीस हजार रुपये उसने दिले होते. दीड वर्षानंतरही हे पैसे परत न केल्याने आरोपीने फिर्यादीला आणि त्यांच्या पतीला हडपसर परिसरातील आपल्या घरात बोलावले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्याने पैशाच्या मोबदल्यात मित्राच्या पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवले.

आरोपीच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने हा संपूर्ण प्रकार त्या कॅमेरात कैद झाला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत. तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here