पुणे (प्रतिनिधी सुहास गायकवाड) | पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर भागात आज पहाटेच्या सुमारास एका मेडिकल शॉपला अचानक आग लागली आहे.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली.
ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या आगीमध्ये हे मेडिकल शॉप जळून खाक झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.







