पालघर (जिल्हा प्रतिनिधी रामदास पाटील) : पालघर जिल्हामध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे सूर्या नदीला पूर आलेला आहे. या पुरामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले.
सूर्या नदीला पूर आल्यामुळे मासवण या गावाजवळ रस्त्यावर पाणी भरले आहे. चारी बाजूला पाणीच पाणी झाले. मनोर वरून पालघर कडे जाणारी , आणि पालघर वरून मनोर कडे येणारी येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले आहे.
या रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली असून वाहने रस्त्याच्या कडेला उभी दिसत असून, सुमारे दीड ते दोन किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.







