सामाजिक कार्यकर्ते अक्षय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सामाजिक उपक्रम

akshay-mahajan

नगर (प्रतिनिधी तुषार महाजन) : आज सामाजिक कार्यकर्ते, शांतप्रिय व्यक्तिमत्व, वक्ता, समाजसेवक अक्षय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतो.

याप्रसंगी अर्जुन, कडुनिंब, चिंच, आवळा अशा जंगली वृक्षांचे रोपण लोणी काळभोरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनिलजी गायकवाड यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच लोणी काळभोर कोळपे वस्ती येथील आंगणवाडी मधील मुलांना वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनविभाग अधिकारी वनरक्षक अंकुश कचरे साहेब यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले या वेळी वनरक्षक अंकुश कचरे, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, हवेली तालुका संपर्क प्रमुख विनोद यादव, दिपक चव्हाण सरदार, चंद्रकांत काळभोर, गहिनीनाथ हुमे सर, तुळशीराम कोंढारी, रंजनाबाई कोळपे जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, तसेच ग्रीन फाउंडेशन, वनविभाग लोणी काळभोर, गिरीश विभा ट्रस्ट, जनाई शिक्षण संस्था, लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते.

 

akshay-mahajan-birthdayअक्षय महाजन यांना सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिर्डी शहर सहप्रमुख, त्यानंतर प्रसिद्धी प्रमुख, राहता तालुकाप्रमुख पदी त्यांनी काम केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिर्डीची संघटनात्मक ताकद उभी करून शिर्डीतील कॉलेज प्रश्नासाठी अविरत संघर्ष करत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून शिर्डीत साई संस्थांनचे कॉलेज खेचून आणणारे विद्यार्थी नेतृत्व, एक समाजाभिमुख सुसंस्कृत व बाणेदार युवा नेतृत्व, अ.भा.वि.प संघटनेच्या माध्यमातून बससेवेसाठी आंदोलन, शिर्डी वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी अनेक आंदोलने केली. शिक्षणमंत्री व पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन दिले. व त्यांच्या कार्यास यश मिळाले. त्याचबरोबर रक्तदान शिबिर, अनाथालय खाऊ वाटप, ४०१ फूट राष्ट्रध्वजाच्या यात्रा व युवा सांस्कृतिक महोत्सवचे असे अनेक समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन केले.

 

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या त्यांनी सोडवल्या. अतिरिक्त शुल्क, मुलींसाठी बससेवा सुरू करणे, असे अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम अक्षय भाऊ यांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केले.

यावेळी बोलताना अमित जगताप म्हणाले, वृक्षरोपण केल्याने केवळ झाडांची संख्यां न वाढता वृक्षारोपणाचे बरेच फायदे आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. परंतु अलीकडे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे, अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. आपल्या सभोवती असणारी झाडे आपल्याला केवळ ऑक्सिजनच न देता इतर गोष्टीही देतात. वृक्षांपासून आपल्याला सावली मिळते थोडक्यात वृक्ष आपल्याला निवाराच देतात. थोडक्यात वृक्ष आपल्याला ऊन पाऊस आणि वाऱ्यापासून बचाव करतात दुपारच्यावेळी गुराखी निवाऱ्यासाठी झाडाखालीच उभे राहतात. वृक्ष एक प्रकारे आपले मित्रच आहेत. अनेक लोकांचा उदरनिर्वाह वृक्षांपासून पूर्ण होतो. म्हणजेच काही लोक झाडांची फळे विकून पैसे कमावतात व आपला उदरनिर्वाह करतात. अनेक पक्षी आणि प्राणी झाडांवर ती लागणारे फळे खाऊन स्वतःची उपजिविका करतात तसेच सर्व पक्षांची घरटी देखील झाडावरच असतात. मनुष्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी झाडे महत्त्वाची ठरतात. झाडांपासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन आणि हवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. अनेक वृक्षांमध्ये तर औषधी गुणधर्म असतात त्यापासून विविध औषध बनवली जातात. ते औषध वापरून बऱ्याच आजारांवर मात केली जाते. थोडक्यात झाडांपासून आपल्याला नवीन जीवनदान सुद्धा मिळू शकते. त्याचप्रमाणे पाऊस पडण्याचे महत्त्वाची भूमिका देखील वृक्षांन मार्फत पूर्ण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here