जळगाव (जिल्हा प्रतिनिधी डॉ.दिपक पाटील) : येथील मतिमंद निवासी शाळेतील मुलांना शुध्द पिण्याकरिता पाणी मिळावे व त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशाने आर ओ मशीन परिश्रम मतिमंद मुला मुलिंचे निवासी शाळेस पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व कंकराज येथील माजी सरपंच सतीश पाटील यांनी आर ओ मशीन शाळेस भेट दिली.

याप्रसंगी त्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपणसुध्दा करण्यात आले.तसेच चोपडा तालुक्यातील वेले येथील मतिमंद महिला व पुरुष यांचे मानव सेवा धर्म या संस्थेस पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट देऊन त्यांना बिस्कीट वाटप करुन व संस्थेस धान्य दिले आहे.







