पुणे (सहसंपादक विठ्ठल घुमरे) : पोलिस व जनतेतील दुवा म्हणून कार्य करणाऱ्या बुलंद पोलीस टाइम्सच्या प्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी जपत पाथर्डी येथील नवोदय ग्रामीण नागरी विकास प्रतिष्ठान व सांस्कृतिक मंडळ पाथर्डी संचलित मतिमंद मुलांचे बालगृहास भेट दिली.
याप्रसंगी बुलंद पोलिस टाईम्सच्यावतीने महाराष्ट्र राज्य उपप्रतिनिधी विठ्ठल घुमरे, अहमदनगरचे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण वराळ आणि शिरूर तालुका रिपोर्टर दीपक वरखडे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी सत्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विठ्ठल घुमरे होते. कार्यक्रमास मार्गदर्शन प्राचार्य सचिन नरवडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार श्री. पायमोडे यांनी मानले.







