पुणे (उपसंपादक अमोल सोळंके) : दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओला कॅबने जात असतांना अमोल सोळंके यांचा सॅमसंग गॅलेक्सी एस २३ मोबाईल कॅबमध्येच राहिला.
मोबाईल हरविलेल्याचे लक्षात येताच त्यांनी दिंडोशी पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलीस उपनिरीक्षक देसाई, पोलीस हवालदार रोडे, माईंगडे, पोटे यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने कॅबचा क्रमांक मिळवून, कॅबमालकाला शोधून काढले.
कॅबमालकाची चौकशी करून त्याच्याकडून या कॅबच्या चालकाची माहिती मिळविली. त्यानंतर सापळा रचून त्या चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून सोळंके यांच्या हरविलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. अवघ्या पाच ते सहा तासात तपास करून मोबाईल परत मिळवून दिल्याबद्दल अमोल सोळंके यांनी दिंडोशी पोलिसांचे आभार मानले आहे.







