पारनेर (तालुका क्राइम रिपोर्टर दिपक वरखडे) : प्रतिक वरखडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजनेचा सन २०१९-२०२० चा जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, राजेश पांडे (सदस्य,रासेयो, राज्य सल्लागार समिती), रवींद्र शिंगणापूर (सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), डॉ.प्रफुल्ल पवार (कुलसचिव-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), सिएमए चारुशिला गायके(वित्त व लेखा अधिकारी,सा. फु.पु.वि),श्रीमती बागेश्री मंठाळकर(सदस्य, मा.व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ),डॉ.संजय चाकणे(सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ),डॉ.सदानंद भोसले(संचालक राष्ट्रीय सेवा योजना),पुणे-अहमदनगर-नाशिक जिल्ह्याचे रासेयो जिल्हा समन्वक यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.
वरखडे यांनी २०१८-२० मध्ये साक्षरता अभियान, प्रधानमंत्री जन-धन योजना व अक्षय ऊर्जा वापर या संदर्भाने ग्राम सर्वेक्षण करून माहिती संकलन करण्याचे काम,ग्रामस्वच्छता,स्वच्छता मोहीम राबवली आपण ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्नाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता म्हणून शौचालयांचा नियमित वापर, सांडपाण्याचे नियोजन, घनकचऱ्याचे नियोजन, वृक्षारोपण व हागणदारी मुक्त गाव अंतर्गत शौचालय खड्डे निर्मिती,तसेच त्यासंदर्भात विविध व्याख्याने, पथनाट्य,शोभायात्रा यांमार्फत गावकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन ग्रामपंचायत आवारात केले गेले.
पुणे-ते पंढरपूर वारी मध्ये सहभागी होत सामाजिक प्रबोधन तसेच वारीचे पालखी तळ स्वच्छ करणे अशी विविध काम केली.२०१९ च्या कोल्हापूर-सांगली महापूरा मध्ये आपत्ती व्यवस्थापन करण्यासाचे काम केले तेथील नागरिक व विद्यार्थी यांच्या भावना समजून घेत शालेय साहित्य वाटप केले. वरखडे यांनी आता पर्यंत २० पेक्षा अधिक राष्ट्रीय, राज्य, जिल्हा या संदर्भात कॅम्प केले आहे,२०२० येथे झालेल्या १० वी भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये सहभाग होत ‘लेक वाचवा लेक शिकवा’ या विषयावर तसेच अनेक मुद्द्यावर आपले मत मांडले मांडले.
हे कार्य करत असताना प्रवरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा शालिनीताई विखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद पारखे,रा.से.यो कार्यक्रम अधिकारी दशरथ पानमंद,निघोज ग्रामपंचायतचे सरपंच सचिन पाटील वराळ,राळेगणसिद्धी ग्रामपंचायतचे सरपंच पंकज कारखीले, मळगंगा ग्रामविकास ट्रस्ट यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.







