मुंबई (निवासी संपादक सुभाष आरोसकर) : जुडो फेडरेशन च्या वतीने ज्युनिअर नॅशनल जुडो चॅम्पियनशिप 2023. महाराष्ट्र A टीम साठी निवड चाचणी घेण्यात आली. त्या स्पर्धेत -73 किलो वजनी गटात (समर्थ व्यायाम मंदिर) व खालसा कॉलेज चा विद्यार्थी आयुष फाळके हा सुवर्ण पदक विजेता ठरला .त्यात गौतम शुक्ला रौप्य पदक आणि कुणाल गुप्ता कांस्यपदक विजेता ठरला.
तसेच-100 किलो गटात साइल सुवर्णा (बिजेसि)हा सुवर्ण पदक विजेता ठरला तर गौरव झोरे (सशि क्लब) रौप्य पदक विजेता ठरला. त्याच प्रमाणे -60 किलो गटात राजन गुप्ता, -90 किलो गटात यश त्रिपाठी यांनी सुवर्ण पदके प्राप्त केली. आणि महिला मध्ये -57 किलो गटात- आर्या पाटील ,-44 किलो गटात श्रेया कागरा ,-48 किलो वजनी गटात नंदिनी देवेंद्र, -70 किलो वजनी गटात भूमी कोरडे आणि-78 किलो गटामध्ये फ्रिया जिजीना या सर्वांना सुवर्ण पदक प्राप्त झाले असोसिएशनचे अध्यक्ष- रविन्द्र पाटील, सचिव- सुरेश समेळ, मॅच प्रमुख -प्रमोद मेंडन यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचे उदघाटन जस्लोक आणि लीलावती हॉस्पिटल चे कमिटी चेअरमन माननीय प्रकाश जी म्हात्रे यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी जुडो चे कनोजिया व बंगेरा सर उपस्थित होते. हे निवड झालेले खेळाडू 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2023 रोजी दिल्ली येथे होणार्या ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियन शिप स्पर्धेत महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणार आहेत.







