जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ रोटरी सर्कल येथे दैनंदिन अपघात होत असतात. त्यामुळे येथे सर्कल ऐवजी पुल बांधण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, पुलावरुन उतरणारी वाहने तसेच पुलावर चढणारी वाहने वेगाने असतात. नुकतेच बोदवड तालुक्यातील स्व. पंजाबराव बोरसे यांचे टँकरने धडक दिल्याने अपघाती निधन झाले. येथे सर्कलऐवजी पुल असता तर हा तसेच पूर्वी घडलेले अपघात टाळता आले असते.
मुळात येथे सर्कल न बांधता आकाशवाणी चौकात उतरणाऱ्या पुलाचे वाढीव बांधकाम करून थेट भुसावळ रस्त्यावरील दूरदर्शन टॉवरपर्यंत पुल बांधल्यास या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल. आतापर्यंत घडलेल्या अपघात पाहता आपणांस हे निवेदन देण्यात येत आहे.
निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.







