एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगावात विविध सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप

एकनाथराव खडसे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त (अमृत महोत्सव) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) जळगाव महानगरातर्फे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले, तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या वतीने व त्यांच्या आयोजनातून श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील १०० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले, तसेच शिवाजीनगर, खटकीजवळ राष्ट्रवादी युवक महानगरातर्फे विनायक पाटील यांच्या सहकार्याने विशेष वैद्यकीय तपासणी शिबिराचे (मेडिकल कॅम्प) आयोजन करण्यात आले होते.एकनाथराव खडसे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाऊ पठाण हे होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विनायक पाटील, माजी नगरसेवक राजू भाऊ मोरे, माजी नगरसेवक सुनील भाऊ माळी, ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव वाघ, महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे, विद्यालयाचे उपाध्यक्ष बाळाजी सानप, भगवान लाडवंजारी, संचालक संतोषभाऊ चाटे आणि मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. प्रतिभा पाटील मॅडम यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षीय भाषणात मजहरभाऊ पठाण यांनी एकनाथराव खडसे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली, तसेच अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. प्रतिभा पाटील आणि दिनेश पाटील सर यांनी केले. सूत्रसंचालन अतुल चाटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

एकनाथराव खडसे एकनाथराव खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here