नाशिकमध्ये महाराष्ट्र व मुंबईतील काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न; राहुल गांधी यांच्या उपस्थितीत समारोप

काँग्रेस

नाशिक (संपादक सुनिल पाटील) । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत महाराष्ट्र व मुंबईतील काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे दहा दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबीर नाशिक येथे पार पडले. या शिबिराचा उत्स्फूर्त वातावरणात व समारोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या दहा दिवसांच्या शिबिरामध्ये पक्ष संघटन बळकट करणे, डिजिटल रणनीती, राजकीय संवाद आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत काँग्रेसची विचारसरणी पोहोचवण्याबाबत सर्व जिल्हाध्यक्षांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या समारोप प्रसंगी राहुल गांधी यांनी उपस्थित नेत्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून उपक्रमाचा आढावा घेतला.

यावेळी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबासह राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांच्या मुलांशी स्नेहमयी संवाद साधल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. हा अविस्मरणीय दिवस व सोहळा आयुष्यात कधीही विसरता येणार नाही, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here