अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन

milind-safai

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : सिनेसृष्टी ज्येष्ठ अभिनेत्री सीम देव यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असताना आणखी एका अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. अभिनेते मिलिंद सफई यांचं आज निधन झालं. आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

मिलिंद सफई यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. त्यांची कॅन्सरशी सुरू असेलली झुंज अखेर आज संपली , त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अनेक मालिका, सिनेमांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली होती. नुकतेच ते लोकप्रिय आई कुठे काय करते या मालिकेतही दिसले होते. या मालिकेत त्यांनी अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मिलिंद सफई यांच्या निधनानंतर त्यांचे सहकलाकार आणि सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

मिलिंद सफई यांनी प्रेमाची गोष्ट, लकडाऊन, पोस्टर बॉईज, मेअअप अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.तसंच मालिकांबद्दल बोलायचं झालं तर, सांग तू आहेस का?, १०० डेज, या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. तसंच गाजलेल्या पुढचं पाऊल मालिकेतही ते महत्त्वाच्या भूमिकेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here