पुणे (जिल्हा प्रतिनिधी सुहास गायकवाड) : अभियांत्रिकी शाखेचे कागदपत्रे तपासणी सुरू असताना, अनेक उमेदवार यांनी वैयक्तीक पातळीवर प्रशासनाकडे बनावट कागदपत्रे सादर केली होती, त्यामध्ये पुणे महानगरपालिकानी ३ कनिष्ठ अभियंता यांच्यावर बडतर्फची कारवाई केली.व माजी सैनिक यांच्या जागा रिक्त ठेवण्यात याव्या, यापुढे पुणे महानगरपालिकांनी कागदपत्रे तपासताना योग्य ती दक्षता घेतली पाहिजे.
यामध्ये फॉर्म 16,बँक स्टेटमेंट, पे स्लिप, अनुभव प्रमाणपत्र, पीफ क्रमांक या सर्व बाबी योग्य रित्या तपासणी केली तर,त्याचा परिणाम दुसऱ्या उमेदवार वर होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता सुध्दा पुणे महानगरपालिकांनी यांच्या कडे कनिष्ठ अभियंता यांची वेटिंग लिस्ट आहे, त्यामध्ये सर्व उमेदवार यांची कागदपत्रे तपासून घ्यावी, यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत, जेणेकरून,अतिरिक्त प्राधिकरण अधिकारी यांची कागदपत्रे तपासणीसाठी नेमणूक करण्यात यावी, आणि असे उमेदवार निवडले जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.
कनिष्ठ अभियंता भरतीमधील निवड झालेल्या काही उमेदवार बाबत तक्रारी आलेल्या होत्या, त्याबाबत चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये अनुभवाचे बनावट दाखले जोडल्याचे स्पष्ट झाले आहे







