नाशिक (संपादक प्रमोद जाधव) : पोलीस आणि जनतेतील दुवा म्हणून वृत्तपत्राच्या माध्यमातून कार्य करण्यासोबतच पोलिसांचे कार्य जनतेपर्यंत पोहचावे यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या साप्ताहिक बुलंद पोलीस टाइम्सच्या उपसंपादकपदी कुबेर बापू जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी बुलंद पोलीस टाइम्सच्या उपसंपादक नेमणूक झाल्याबद्दल कुबेर जाधव यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना मुख्य संपादक सुनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार यांच्यासमवेत कार्यकारी संपादक समाधान पाटील, प्रहारचे कृष्णा जाधव, पत्रकार सोमनाथ जगताप आदी उपस्थित होते.







