महाराष्ट्र विद्यालयातील खेळाडूंची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

maharashtra-school

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) : २५ व २६ ऑगस्ट २०२३ वार शुक्रवार व शनिवार रोजी क्रीडा संकुलन सोलापूर येथे १४,१७ व १९ वयोगटातील मुले व मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धांमध्ये जिल्ह्यातून अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाच्या वयोगट १७ मुली मध्ये कु. सिद्धी पोतदार , वयोगट १९ मुलींमध्ये कु.संस्कृती पोतदार, कु.समृद्धी कुलकर्णी,कु.नम्रता शेळके व १९ मुलांमध्ये चि.आदित्य लटके व चि.सोहम सोनार या सर्व खेळाडूंनी शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत यश संपादन करत एकूण ०६ खेळाडूंची शालेय विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली.

या स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून श्री.योगेश उपळकर यांनी काम पाहिले. वरील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री.अनिल पाटील, श्री.पी.डी पाटील, श्री.योगेश उपळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे,सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, संस्था सदस्य श्री.बी.के.भालके ,सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य,महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्या श्रीमती के.डी.धावणे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here