मुंबई (महाराष्ट्र राज्य उपसंपादक कायदेशीर सल्लागार ॲड. चंद्रशेखर आठल्ये) : बॅकिंग क्षेत्रात १०६ वर्षांची अखंड विश्वासार्ह वाटचाल करीत असलेल्या दि कराड अर्बन को-ऑप बँक लि.च्या भोईवाडा शाखेचे स्थलांतर काल (दि.२९ ऑगस्ट) मस्जीद बंद येथे करण्यात आले.
मस्जीद बंदर येथील नूतनीकृत शाखेचे उद्घाटन माजी सहकार व पणनमंत्री आ.बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्यनारायण पुजेचेदेखील आयोजन करण्यात आले. नरसी नाथा स्ट्रीट कायाबाझार मस्जीद बंदर येथे सुरु झालेल्या अत्यानुधिक शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांच्यासह संचालक मंडळातील सीएस स्वानंद पाठक, श्रीरंग ज्ञानसागर, महिपती ठोके, विजय चव्हाण. डॉ. विनीत एरम, प्रा.अनिल बोधे, चंद्रकुमार डांगे, महादेव शिंदे, डॉ.राहुल फासे, शशांक पालकर, राजेंद्र कुंडले, राजेश खराटे, सौ.रश्मी एरम, सुनिता जाधव, सीए अतुल दोशी, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.
व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल लाहोटी, संचालक डॉ.सुभाष एरम, सुभाषराव जोशी, समीर जोशी, अनिल इनामदार, लक्ष्मीनारायण सरलाया, मंगेश टोके आदींचीही यावेळी उपस्थिती होती.







