बुलंद पोलिस टाइम्सचे मुख्य संपादक सुनील पाटील यांची देवळा पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट

devala-police-station

नाशिक (संपादक प्रमोद जाधव) : पोलीस आणि जनतेतील दुवा म्हणून वृत्तपत्राच्या माध्यमातून कार्य करण्यासोबतच पोलिसांचे कार्य जनतेपर्यंत पोहचावे यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या साप्ताहिक बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक यांनी देवळा येथे सदिच्छा भेट दिली.

 

या भेटी दरम्यान प्रथमतः त्यांनी देवळ्याचे भुमीपुत्र जेष्ठ मुक्त पत्रकार कुबेर जाधव यांना उपसंपादक पदाचे नियुक्तीपत्र दिले. तसेच देवळा पोलिस ठाण्याला आवर्जून भेट दिली. यावेळी देवळा तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी उपनिरीक्षक दिपक पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 

यावेळी देवळा शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच आगामी कार्याविषयी चर्चा करत बुलंद पोलिस टाइम्सच्या कार्याविषयी मुख्य संपादक सुनील पाटील यांनी उपनिरीक्षक दिपक पाटील यांना माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत नवनियुक्त उपसंपादक कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव हे ही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here