विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी केले जेरबंद

विनयभंग
file photo

मडगाव (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यात एका पीटी शिक्षकानेच एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी या प्रकरणात रमेश सोनू गांवकर या पीटी शिक्षकाला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, गोव्यतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सरकारी हायस्कुलमध्ये रमेश हा पीटी शिक्षक आहे. एका विदयार्थीनीचा त्याने हात पकडला होता. तसेच ती दोरीउडीचा सराव करताना तो तिला नेहमी न्याहाळात होता. तिला आपल्या मोबाईलवरुन त्याने पोर्नोग्राफी व्हिडीओही पाठविले होते. त्या मुलीने पालकांना ही बाब सांगितल्यानंतर हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला होता. संशयिताविरोधात कुंकळ्ळी पोलिसांनी भादंसंच्या ३५४ (अ) व ५०९, गोवा बाल कायदा कलम ८, बाल सरंक्षण कायदा व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६३, ६७ (अ) अंतर्गंत गुन्हा नोंद केला आहे. बुधवारी रात्री त्याला पोलिसांनी अटक केली.

पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण पुढील तपास करीत आहेत. विनयभंगाची वरील घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. बुधवारी या संबधी कुंकळ्ळी पोलिसांत त्या हायस्कुलच्या मुख्याध्यीपिकेने तक्रार नोंदविली. पोलिसांनी लागलीच या प्रकरणाचा तपास करुन संशयिताला जेरबंद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here