वर्धा (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील आश्रमशाळेत गाद्या ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था असलेल्या खोलीत गाद्यांच्याखाली एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा मृतदेह गाद्याच्या खाली कोणी तरी लपवून ठेवला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील स्व. यादवरावजी केचे नावाची आश्रम शाळा आहे. शिवम सनोज उईके असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील विद्यार्थी होता. बुधवारी रात्रीच्या सुमारास शाळेतील विद्यार्थी झोपण्याकरिता गाद्या काढत असताना त्यांना गादीखाली मृतदेह आढळला आहे.
ज्यावेळी विद्यार्थ्याचा मृतदेह गाद्यांखाली सापडला, त्यावेळी तिथं उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी भयभीत झाले होते. त्यांनी ही गोष्ट तिथल्या कर्मचाऱ्यांच्या कानावर घातली. त्यांनतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी असा नाराजीचा सूर पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.







