देवळा प्रहार संघटने कडून रक्तदान शिबिर आयोजित; एपीआय दीपक पाटील यांनी केले रक्तदान

blood-donatation

वाखारी (प्रतिनिधी दादाजी हिरे) : आज देवळा येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थ देवळा येथे प्रहार संघटना देवळा तालुका वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

 

रक्तदान अनेकांसाठी जीवनदान असुन राष्ट्रीय कर्तव्य आहे. म्हणुन रक्तदान शिबिरात देवळा तालुक्यांचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मा दिपक पाटील साहेब यांनीही स्वतः रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य निभावले. अनेक रक्तदात्यांनी रक्तदान प्रसंगी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य निभावले.

 

wakhari-blood-donatationरक्तदान शिबिरात अनेक मान्यवर मा तहसीलदार तसेच ह भ प संजय नाना धोंडगे महा. राज्य मेडिकल असो. अध्यक्ष व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदान केले. उद्घाटन प्रसंगी देवळा तालुक्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच उपजिल्हाध्यक्ष कॄष्णा भाऊ जाधव जिल्हा कार्याध्यक्ष दशरथ पुरकर जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे बाळासाहेब पवार सुभाष पवार माधव ठोंबरे तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर जनशक्ती तालुकाध्यक्ष शशिकांत पवार गटप्रमुख आकाश थोरात गण प्रमुख स्वप्निल पगार किरण काकुळते हरिश्चंद्र भोजने योगेश निकम युवराज देवरे आदींनी परिश्रम घेतले.

 

सहकार विद्यामंदिर शाळेतील मुलं दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी जात होती. परंतु त्याचवेळी मांडवा गावाजवळ एसटी बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट शाळकरी मुलांच्या वाहनाला धडकली. या अपघातात चालकासह १७ मुलं जखमी झाली आहेत. अपघातातील जखमी मुलं ही ६ ते १६ वर्षे वयोगटातील आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here