जळगाव (संपादक सुनिल पाटील) – श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात
आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री अशोकभाऊ लाडवंजारी हे होते,तर ध्वजरोहनासाठी संस्थेचे संचालक श्री वासुदेवभाऊ सानप हे प्रमुख अतिथी होते.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री पन्नालाल लाडवंजारी , डॉ. अभिषेक ठाकुर , संचालक श्री देविदास आंधळे , श्री गजानन लाडवंजारी , श्री भगवान लाडवंजारी , श्री संतोष चाटे , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दिवाकर जोशी , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ईश्वरी ईखे मँडम हे प्रमुख अतिथी होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी भारत माता व प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजारोह श्री वासुदेव भाऊं सानप यांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख आथितींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. आभिषेक ठाकूर यांनी covid 19 या जागतिक महामारी विषयी उपस्तिताना मार्गदर्शन केले.सर्वांनी कोरोना चाचणी करणे का आवश्यक आहे याबद्दल माहिती दिली.संस्थेच्या वतीने त्यांचे शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अतुल चाटे सर यांनी केले तर आभार सौ प्रतिभा पाटील मँडम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.








