यावल कृषि उत्पन्न बाजार समितीत ध्वजारोहण

यावल (सुरेश पाटील) – येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत आज दि. १५ रोजी सकाळी ७.१५ वा. ध्वजारोहण करून स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सभापती मुन्नाभाऊ पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत गान होऊन राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली.
यावेळी बाजार समिती संचालक कृषिभूषण नारायण बापु चौधरी, पुंजोशेठ पाटील, सुनिल बारी, सचिव स्वप्नील सोनवणे, सहाय्यक सचिव विजय कायस्थ यांचेसह सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थीत होते. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here