शहादा शहरात 74 वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा; ठिकठिकाणी कोरोना योध्दांचा सन्मान

शहादा ( विजय निकम) – शहरातील शासकीय कार्यालय आवारात 74 वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. स्वतंत्रता दिवस साजरा करतांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे योग्य ते पालन करून ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला.
येथील प्रांताधिकारी कार्यालय आवारात स्वतंत्रता दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .यावेळी प्रांताधिकारी श्री चेतन सिंग गिरासे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. कोरोना संसर्गाचा काळात सर्वसामान्य जनतेपर्यंत मदतीचा हात देणाऱ्या कोरोना योध्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कोरोना योध्दांना ‘कोवीड योद्धा ‘म्हणून प्रशस्तीपत्र देण्यात आले. कोरोना योद्धा म्हणून आरोग्य विभागातून डॉ.आरिफ शहा ( बी एच ओ ), सी.टी पाटील (प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी) आणि योगिता वडवी (जीएनएम) यांना प्रशस्तीपत्र देऊन प्रदान करण्यात आला. त्यानंतर पोलीस विभागातून पोलीस कोरोना योद्धा अफसर शाहा, कोवीड योद्धा म्हणून श्री .जलाल शेख पोलीस हवालदार ,श्री पुष्पेन्द्र कोळी पोलीस नाईक ,अनमोल राठोड , शाना भाऊ ठाकरे व स्वप्नील गोसावी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नगरपरिषद विभागातून रवींद्र पाटील, संदीप टेंभेकर शाखा अभियंता व सफाई कामगार शंकर वाघ यांना कोवीड योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.
तसेच तहसील कार्यालयाच्या नवीन इमारत परिसरात प्रांताधिकारी श्री . चेतनसिंग गिरासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी तहसीलदार श्री मिलिंद कुलकर्णी व तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समिती परिसरात सभापती सौ.बाईजाबाई प्रताप भिल यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आला. कोरोना संसर्गाचा काळात अतिशय साध्या पद्धतीने राष्ट्रगीत व ध्वजवंदन करून स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला.यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,उपसभापती, पंचायत समिती सदस्य व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
शहरात स्वतंत्र दिवस ठिकठिकाणी अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी जनतेने पाडलेला संयम व शांतता कौतुकास्पद असल्याचे निदर्शनास आले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम या वर्षी रद्द करण्यात आले होते. तरी भारतीय स्वतंत्र दिवसाचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here