पुण्यात सहा बांगलादेशी महिलांसह अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात

bangaldesi-arrested-in-pune

पुणे (जिल्हा प्रतिनिधी सुहास गायकवाड) : शहरात अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. ६ महिलांसह एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सामजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे.

बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करण्यासाठी या महिला तेथे राहत होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सगळे बांगलादेशी नागरिक अवैधरित्या पुण्यात राहत होते. महिन्याभरात पुणे पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई आहे.

काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी बुधवार पेठ परिसरांमधूनच १९ बांगलादेशींना अटक केली होती. यामध्ये १० बांगलादेशी महिला आणि ९ पुरुषांचा समावेश होता. बुधवार पेठ परिसरात गेल्या ३ महिन्यांपासून हे १९ बांगलादेशी अवैध पद्धतीने वास्तव्य करत होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकालाही यावेळी अटक करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here