भैरवनाथ शिक्षण संस्थेचे सहशिक्षक गणेश कदम जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

ganesh-kadam

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) : निर्भय ट्रस्ट मुंबई संचलित सोलापुर विभाग यांच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बार्शी तालूक्यातुन भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेत शिक्षक म्हनुण नोकरी करत असलेले श्री गणेश कदम सर यांना सोलापुर येथील शानदार सोहळ्यात प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

निर्भय प्रतीष्ठान ही राज्यस्तरावर सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेञात कार्य करणारी नामाकींत ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षकदिनाचे औचित्य साधुन जिल्हातील प्रत्येक तालूक्यामधुन शालेय उपक्रमाबरोबर सामाजिक क्षेञात आपला ठसा उमटवणारे शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर करण्यात आले.

पुरस्कार प्रदान सोहळा १० सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक सभागृह सोलापुर येथे संपन्न झाला.या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हनुण लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई येथे हायकोर्टात वकील आहेत सुमारे ४५०० पुरस्कार विजेते नामाकिंत वकील रमेश राठोड व ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती भारती रणशूर तसेच शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री सुजितकुमार काटमोरे सर यांच्या हस्ते पूरस्कार प्रदानखन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी निवडपाञ शिक्षक, मुख्याध्यापक, सहपरीवार,मिञपरीवार खुप मोठ्या संख्येने उपस्थित होता. बार्शी तालुक्यातुन गणेश कदम सर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे स्तरातुन अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here