सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) : बार्शीमध्ये मेहेर किड्स स्कूल येथे तनिष्का सकाळ च्या माध्यमातून बार्शी मध्ये शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर, बार्शी सिंधूताई देशमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या आयोजक सौ भावना गाडेकर होत्या. मेहेर किड्स च्या संस्थापक सौ. विजयश्री पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले.
सौ. सुनीता गाडेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तवाना केली. तसेच उपस्थित सर्व शिक्षिकांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला त्यांचे कार्याचे कौतुक करण्यात आले. सत्कारार्थी शिक्षकांमध्ये भाग्यश्री शेळके, मेघा कुंभार,स्नेहा मदने, स्मिता सुरवसे,शीतल पवार,माधुरी शिंदे,शुभांगी नेवाळे,अश्विनी मिरगणे,रेखा सुरवसे,विजयश्री पाटील ,प्रतिभा शिंदे, अर्चना बीचितकर,मनिषा गाढवे ,हेमांगी मिरगणे,शीतल शिंदे ज्योती गुरव, रोहिणी चंदनशिव यांचा समावेश होता.
बार्शीच्या लेडी सिंघम सिंधू देशमुख यांचे नुकतेच प्रमोशन झाले असल्याने व त्यांनी समाजाकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्याकरिता त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या ताई सौ.रत्नमाला नारवडे उपस्थित होत्या. सिंधू देशमुख यांच्या
सत्काराप्रसंगी त्या भावुक झाल्या, त्यांनी सिंधू देशुमख यांच्या यशामागील आलेल्या अडचणी सांगितल्या.
त्यानंतर सिंधू देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्या बोलतांना म्हणाल्या की, शिक्षण मंडळाला विद्यापीठातून एक तर पाठ असा यावा की अल्पवयीन मुलांसाठी काय कायदे आहेत हे त्यांना समजावे. त्यांनी निर्भया पथक द्वारे आणि इतर सामाजिक,मुलीच्या अडचणी दूर केल्या, दिवस रात्र न पाहता त्यांनी खुप मुलीचे प्रश्न सोडवले. त्यानंतर विजयश्री पाटील यांनी त्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अंधारे यांनी केले. शिराळा तालुका प्रमुख अर्पणाताई यांनी सर्वांचे आभार मानले.







