नायजेरियात प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली; २६ ठार, ४४ बेपत्ता

Nigeria-Boat-Capsized

नायजेरिया (वृत्तसंस्था) : नायजेरियातील सेंट्रल नायजर राज्यातील मोकवा भागात बोट उलटून २६ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ४४ लोक अद्याप बेपत्ता आहेत. प्रशासनाकडून सध्या बचावकार्य सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नायजेरियात रविवारी बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या बोट अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण बेपत्ता झाले असून सध्या शोधकार्य सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतात घेवून जाताना ही दुर्घटना घडली. या बोटमधून १०० हून अधिक लोक प्रवास करत होते. मोकवा गावाजवळ ही बोट उलटली.

मिळालेल्या माहितीनुसार, बोट दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले होती. तर अपघातातील सुमारे ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. नायजेरियन राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने सागरी पोलीस आणि स्थानिक गोताखोर पाण्यात बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here