मुंबई (प्रतिनिधी) : सायनमध्ये सोमवारी पहाटे भरधाव कार दुभाजकला धडकून भीषण अपघात झाला. अपघात होताच गाडीने क्षणात पेट घेतला. अपघातानंतर गाडीचे दरवाजेही आपोआप लॉक झाले. गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने गाडीतून प्रवास करत असलेल्या दोघा भावांना बाहेरच पडता आले नाही.
गाडीने पेट घेतल्याने कारच्या आतचा दोन्ही भावांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी आहेत. अजय वाघेला आणि प्रविण वाघेला अशी दोन्ही भावांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र मदत पोहचण्यापूर्वीच गाडी आगीत जळून खाक झाली होती. घाटकोपरला पार्टी करून मरीना ड्राईव्हला फेरफटका मारण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे.







