गणेशोत्सव वर्गणीसाठी दुकानदाराला मारहाण करुन तोडफोड

marhan
file photo

पुणे (प्रतिनिधी सुहास गायकवाड) : गणेशोत्सवासाठी ३ हजार रुपयांची वर्गणी मागितल्यानंतर इतकी वर्गणी देण्यास तयार नसल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण करुन दुकानाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुकानदार दिनेश भिकाराम गोरा (वय २०, रा. लोणी काळभोर) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. ५७१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवम जयपाल सिंग ऊर्फ मुन्ना (वय २७), तुषार संजय थोरात (वय १९), निखिल दिलीप कांबळे (वय १९) व त्यांच्या एका साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोणी स्टेशन येथील न्यू बालाजी ट्रेडर्समध्ये रविवारी रात्री आठ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या भावासोबत किराणा दुकानात काम करत होते. त्यावेळी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळ व अष्टविनायक मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे वर्गणी मागण्यासाठी आले. त्यांनी फिर्यादीकडे ३ हजार रुपयांची वर्गणी मागितली. फिर्यादी हे १०१ रुपये वर्गणी देण्यास तयार होते. तरीही ३ हजार रुपयांची पावती फाडावी, अशी त्यांनी मागणी केली. फिर्यादीने त्याला नकार दिल्यावर शिवम व निखिल यांनी फिर्यादी यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. तुषार याने दुकानातील कॅल्युलेटर व मोबाईलची तोडफोड करुन शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here