मणिपूरमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

earthquake
File Photo

इंफाळ (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्रबिंदू राज्यातील उखरूलपासून ६६ किमी दूर होते.

एनसीएसच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. हा भूकंप सोमवारी रात्री ११ वाजून एक मिनिट आणि ४९ सेकंदाला झाला होता.

याशिवाय मंगळवारी सकाळी तीन वाजून ३९ मिनिटांनी अंदमानाच्या समुद्रातही भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता ४.४ मॅग्निट्यूड इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत ९३ किमी खोल होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here