ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा ५ ऑक्टोबरला

only-samajseva

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने घेत असलेल्या समाजसेवा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या उपस्थितीत तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख मान्यवराच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होत आहे.

संस्थेच्या वतीने आवाहन केल्यानुसार अनेक शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाल्या असून दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत आपले प्रस्ताव संस्थेकडे पाठवून द्यावेत. आज (दि.१३) रोजी ओन्ली समाजसेवेचे शिष्टमंडळ अध्यक्ष राहुल वाणी सचिव विजयकुमार दिवाणजी सहसचिव नागनाथ सोनवणे खजिनदार मानकोजी ताकभाते तालुकाध्यक्ष अजय तिवारी व इतर कार्यकर्ते यांनी जिल्ह्याचे एस.पी शिरीष सरदेशपांडे यांची समक्ष भेट घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून आपण उपस्थित रहावे, याबाबतचे लेखी पत्र संस्थेच्यावतीने त्यांना दिले.

गुरुवार दि. ५ ऑक्टोबरला हा शानदार आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानचिन्ह सोहळा माऊली लॉन्स (अमृत राऊत) येथे दुपारी एक वाजता संपन्न होणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बाशी॔तील सामाजिक संघटना, संस्थेचे हितचिंतक असे आपल्या सर्वांचे सहकार्य ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या पाठीशी असावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here