अमळनेर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असून, आता अमळनेरातून भावाला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार झालेल्या अत्याचारातून ही अल्पवयीन पीडीता गर्भवती राहिली असून,. पीडीतेने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह राहायला आहे. गेल्या तीन महिन्यापासून दि.१३ जुलै ते १७ सप्टेंबर या दरम्यान संशयित आरोपी विशाल कोळी(वय २०) हा रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या घरी येवून तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देत घरात व घराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत अत्याचार करीत होता.
या वारंवार होणाऱ्या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी संशयित आरोपी विशाल कोळी याच्या विरोधात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी.भगवान शिरसाठ हे करीत आहेत.







