कोयत्या गँगने केली पोलिसाच्या मुलाची हत्या

Vijay-Dhume-Murder

पुणे (जिल्हा प्रतिनिधी सुहास गायकवाड) : पुण्यात कोयत्या गँगचा हैदौस सुरुच आहे. पुण्यात सिंहगड रस्त्यावर पोलिसाच्या मुलाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. चार ते पाच हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत पोलिसाच्या मुलाची हत्या केली आहे. काल शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सिंहगडमध्ये लाईन बॉय विजय ढुमे यांचा धारदार हत्यार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ ही घटना घडली. आज सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पुण्याच्या सिंहगड येथील एका लॉजमधून विजय ढुमे खाली उतरत होते. या लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. हल्ल्यानंतर विजय ढुमे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. सिंहगड रोड पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या हत्या प्रकरणातील आरोपींचा तपास सुरू आहे. या हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here