अभिनेते दिलीप जोशी यांनी जेठालालच्या भूमिकेतून घेतला ब्रेक

actor-dilip-joshi

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : गेल्या १४ वर्षांपासून ‘तारक मेहता का उलट चष्मा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम रोज आपल्या भेटीला येतो. या कार्यक्रमातील कलाकारांना दररोज शूटिंग करावे लागते. त्यामुळे त्यांना स्वतःचा असा वेळ खूप कमी मिळतो.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील जेठालाल गढा हे पात्र गेली १४ वर्षे काम करत आहे. हे एक असे पात्र आहे जे सुरुवातीपासून बदलले नाही. परंतु आता हे पात्र आपल्या भेटीला येणार नाही. अभिनेते दिलीप जोशी यांनी कार्यक्रमातून ब्रेक घेतला आहे.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’च्या कालच्या भागात दाखविण्यात आले की, गोकुळधाममध्ये सर्वजण गणेशोत्सव साजरा करत आहेत तर जेठालाल बॅग पॅककरून बाहेरगावी जाण्यासाठी निघाला आहे. दिलीप जोशी खऱ्या आयुष्यात देखील परदेशात गेले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी त्यांच्या कुटुंबियांसह टांझानिया येथे धार्मिक यात्रेसाठी गेले आहेत.

दिलीप जोशी यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, ‘अबू धाबी येथे एक खूप मोठे हिंदू मंदिर बनणार आहे. त्यानिमित्त तेथे ‘फेस्टिवल ऑफ हारमनी’ साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी आवश्य उपस्थित राहा’ असे आवाहन करणारी पोस्ट दिलीप जोशी यांनी केली आहे.

जेठालाल कार्यक्रमात नसल्याची चर्चा बबितामुळे झाली. २८ तारखेला मुनमुन दत्ताचा वाढदिवस होता. मुनमुन दत्ताने सेटवरील वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये जेठालाल न दिसल्याने चर्चा सुरू झाली. अखेर जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांनी काही दिवसांसाठी कार्यक्रमातून ब्रेक घेतला असल्याचे समोर आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here