न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : सध्या जगभरात पावसाने थैमान घातले असून विविध शहरांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला शुक्रवारी (२९, सप्टेंबर) मुसळधार पावसाने झोडपले. या मुसळधार पावसामुळे महामार्ग आणि घरे पाण्याखाली गेली. शहरातील पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले असून लोक गाड्या, घरांमध्ये अडकून पडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जगातील सर्वात आधुनिक शहरांपैकी एक असलेले न्यूयॉर्क शहराला पावसाचा तडाखा बसला. शुक्रवारी पावसाने न्यूयॉर्कला पूर आला. त्यामुळे रेल्वे मार्ग विस्कळीत झाला. तसेत रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकही महामार्गावर गाड्यामध्येच अडकून पडले.
Emergency in nyc pic.twitter.com/oNl1idC937
— EveryThing Plus ULTRA (@EveryTPlusULTRA) September 29, 2023
पावसाचा जोर पाहून लागार्डिया विमानतळावरील एक टर्मिनल काही तास बंद ठेवावे लागले. शहरातीस पुरस्थिती पाहून पाहून न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी आणीबाणी जाहीर केली. आहे. तसेच नागरिकांना बाहेर न पडण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.
लागार्डिया विमानतळावरील इंधन क्षेत्र आणि आजूबाजूचे रस्ते जलमय झाले आहेत आणि किमान 259 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर किमान 94 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.







