रायगडमध्ये मनसे आक्रमक; इंग्रजी भाषेतील पाट्यांवर फासलं काळं

mns-active-in-raigad

रायगड (प्रतिनिधी जयपाल पाटील) : मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झालेत. रायगडच्या माणगावमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी इंग्रजी भाषेतील पाट्यांवर काळं फासलं आहे.

मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, संपर्क अध्यक्ष चिमण सुखदरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठी पाट्यांसाठी मनसे सक्रिय झाले आहे. चार दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिलेत.

सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात सर्व दुकानदारांना मराठीत पाट्या लावण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली आहे. दोन महिन्यांची मुदत संपण्याआधी सर्व दुकानदारांनी मराठीत पाट्या लावणे गरजेचे आहे. त्यामुळे आता दुकानावरील पाट्यांबाबात देखील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here