पिलीव (पश्चिम महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर विनोद लोखंडे) : माळशिरस तालुक्यातील पिलीव पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदी अतुल नष्टे तर उपाध्यक्ष पदी विश्वजीत गोरड यांची एक मताने निवड करण्यात आली .तसेच कार्याध्यक्ष पदी प्रमोद भैस,संघटक प्रा.संजय पाटील,सचिव शाहरुख मुलाणी यांची निवड करण्यात आली.
कार्यकारणी सदस्य पदी रघुनाथ देवकर,संजय रोकडे, सुजित सातपुते, उदय कदम,अभिजीत तावरे, गणेश देशमुख,सतिश पारसे,विनोद लोखंडे यांच्या निवडी करण्यात आल्या.या निवडीबद्दल परिसरातील सर्व सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.







