पिलीव (पश्चिम महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर विनोद लोखंडे) : येथे आज (ता. १३) पिलीव ग्रामपंचायतच्या ‘महात्मा फुले’शॉपिंग सेंटर नूतन इमारत उद्घाटन,आमदार मा. श्री.रामभाऊ सातपुते व आमदार मा.श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार फंडातून आलेल्या पिलीव मुख्य पेठेतील रस्त्याचे भूमिपूजन,जलजीवन ‘ मिशन योजनेतील पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन,बाजार तळावरती मच्छी मार्केटच्या दोन गाळ्यांचे उद्घाटन,संत सावता माळी सभामंडप उद्घाटन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा नेते मा.श्री.धैर्यशील मोहिते-पाटील,माजी सभापती मा.श्री.संग्रामसिंह जहागीरदार उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली .कार्यक्रमाच्या सुरुवातीस पिलीवचे सरपंच नितीन मोहिते यांनी प्रास्ताविकात पिलीव मध्ये केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. संग्राम सिंह जहागीरदार गणेश पाटील यांची यावेळी भाषणे झाली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी विलास बाबर , अकलूज बाजार समितीचे उपाध्यक्ष मामासाहेब पांढरे , संचालक बाबूराव
कदम , गटविकास अधिकारी विनायक गुळवे , दरवेशी चौगुले , कृषी विस्तार अधिकारी अनिल सावळजकर , माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील , शहाजी महाडिक , ज्येष्ठ नागरिक रामचंद्र कोळी , अॅड . मानसिंह जहागीरदार , अॅड . वैभव मेथवडे चंद्रकांत जाधव , अरविंद जाधव , शिवाजीराव सावळजकर , ग्रामपंचायत सदस्य सुषमा जामदार , संजय आर्वे , शमशाद काझी , अनिता जेऊरकर दत्तात्रय बोडरे , दादा देशमुख , चंद्रकांत माळी , ज्योती फाळके आदी उपस्थितीत होते . सरपंच नितीन मोहिते- माळी यांनी प्रास्ताविकात ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांची माहिती दिली . आभार सुषमा जामदार यांनी मानले .







