अकलूज (पश्चिम महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर विनोद लोखंडे) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १५१ जणांनी रक्तदान केले . जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते उत्तमराव जानकर यांनीही कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली . त्यावेळी त्यांच्याबरोबर अक्षय वाईकर व इतर कार्यकर्ते होते .
या कार्यक्रमास तालुका प्रमुख संतोष राऊत.अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे , माळीनगर शहर प्रमुख अरुण मदने , माळीनगर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण डोईफोडे , बाळासाहेब भोसले , ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख उमेश जाधव , तालुका समन्वयक सतीश कुलाळ , तालुका सचिव चंद्रकांत देवकर , उपतालुका प्रमुख रामकृष्ण जाधव , वेळापूर शहर प्रमुख आप्पा कांबळे , पिलीव शहर प्रमुख योगेश देशमुख , अमर खंडागळे , जावेद शेख , विवेक देशमाने , माळशिरस शहर प्रमुख अशोक देशमुख , उपतालुका प्रमुख विजय रुपनवर , गट प्रमुख मिलींद मोरे , रज्जाक मुलाणी गोरख पवार , लाला मगर , ज्येष्ठ शिवसैनिक अॅड . पी . व्ही . कुलकर्णी , बापू मुंडफणे , दत्ता काशीद , विद्या साळुंखे , कुंभार , सचिन चव्हाण , दीपक दोरकर , गणेश काळे , रणजित अंबुरे , ओंकार वायकर , संतोष वझे , गोरख गोल्ड , दीक्षित व शेकडो शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला .







