प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पिलीव विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्रीराम

पिलीव (ता .माळशिरस) (पश्चिम महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर विनोद लोखंडे ) : श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्यात होणाऱ्या प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त पिलीव येथे श्री राम मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

piliv-ramआयोजित कार्यक्रमासाठी पिलीवतील समस्त ग्रामस्थांनी देणगी, सेवा व उपस्थिती होती.यावेळी प्रभू श्रीरामांच्या जयघोषान देण्यात आल्या.पिलीव बाजारपेठ रांगोळ्या व भगव्या पथाक्यांनी सजली होती . सर्व मंदिरांची स्वच्छता व विद्युत रोषणाई, पेठेची स्वच्छता केली होती.सकाळी एसटी स्टँड पासून श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढली होती.यावेळी पिलीव नगरीमध्ये हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन हे घडले . मुस्लिम बांधवांनी रथयात्रेचे स्वागत केले .या मिरवणुकीमध्ये तरुण कार्यकर्ते ,महिला व piliv-ramनागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

 

श्रीराम मंदिरामध्ये भजन, कीर्तन व आरतीचा कार्यक्रम झाला.यावेळी आमदार राम सातपुते यांनीही श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. सर्व ग्रामस्थांच्या देणगीतून लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here