
पिलीव (माळशिरस तालुका क्राईम रिपोर्टर अमोल माने) : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील देवांग कोष्टी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी वृत्तपत्र विक्रेते संजय अनंता रोकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी किरण करमाळकर, सचिवपदी नरेंद्र दिवटे, सहसचिवपदी प्रशांत टकले, खजिनदारपदी विनोद तावरे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी झालेल्या समाजाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक नागेश कलढोणे, तसेच पांडुरंग बुगड, परिमल बुगड ,प्रभाकर लोटके, जयंत करमाळकर राजकुमार फासे,यांच्यासह देवांग कोष्टी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी आघाडी व चैतन्य सहकारी पतसंस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी चेअरमन नानासाहेब देशमुख अरिफखान पठाण अमोल मदने पाटील प्रभाकर वाघमारे रघुनाथ नरळे जगन्नाथ करडे प्रदीप चोबे पोपट गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.






